मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: Ladki Bahin Yojana | Ladki Bahini Yojana

Mukhymantri majhi ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra

लाडकी बहिण योजनेला 5 स्टार दया
[Total: 13 Average: 4.8]

Mukhyamantri majhi ladki bahin yojana ची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या द्वारे २८ जून २०२४ रोजी राज्याच्या आर्थिक बजेट मध्ये करण्यात आली, या योजने अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना १५०० रुपये प्रति महिना थेट महिलांच्या बँक खात्यात मिळणार आहे, राज्यातील २१ वर्ष ते ६५ वर्ष वयोगटातील सर्व महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे आणि पोषण सुधारणे या उद्देश्याने राज्य सरकारने या महिला कल्याणकारी योजनेचा शुभारंभ केलेला आहे.

महाराष्ट्रातील महिलांमध्ये अनेमियाचे प्रमाण ५०% पेक्षा जास्त आहे, तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१०% व स्त्रियांची टक्केवारी २८.७०% आहेत हि वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे या करिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे.

या योजने अंतर्गत राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना १५०० रुपये प्रति महिना आर्थिक मदद केल्या जाते ज्यामुळे महिला आपल्या पालन पोषण, स्वास्थ, आणि छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करू शकते, महिलांना आता आर्थिकदृष्ट्या त्यांच्या परिवारांवर अवलंबून राहायची आवश्यकता नाही आहे।

Ladki bahini yojana साठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून सर्व पात्र महिला ऑफलाईन आणि ऑनलाईन (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) अर्ज सादर करू शकतात, ऑफलाईन अर्ज महिला जवळील अंगणवाडी, ग्रामपंचायत किंवा CSC केंद्र मधून सादर करू शकतात।

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते, अर्ज प्रक्रिया काय आहे, अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील, लाडकी बहीण योजना हमीपत्र काय आहे आणि कुठून डाउनलोड करायचं याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे आणि त्यात योजनेची पूर्ण उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजना वर्णन

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र राज्य
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन / ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३० सप्टेंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana Maharashtra

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना काय आहे

Ladki bahini yojana महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली एक योजना आहे, या योजने अंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील सर्व विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना १५०० रुपये प्रति महिन्याची आर्थिक मदद राज्य सरकार द्वारे केली जाते।

या योजनेसाठी केवळ महाराष्ट्रातील महिला रहिवासी पात्र असतील आणि इच्छुक महिला या योजनेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. राज्य सरकारने 1 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू केली असून आतापर्यंत राज्यातील 3 कोटींहून अधिक महिलांना लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळाला आहे.

Ladki bahin yojana online apply करण्यासाठी, राज्य सरकारने सुरू केलेल्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर महिला नोंदणी करू शकतात आणि त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात आणि ज्या महिला ऑनलाइन अर्ज करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करता येतो, या करिता महिला अंगणवाडी, ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज सादर करू शकतात, अर्ज करण्यासाठी, महिलांना फक्त आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्र आवश्यक असतील.

ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर महिलांचे अर्ज तपासले जातील आणि त्या नंतर पात्र महिलांचे अर्ज स्वीकार करून लाभार्थी महिलांची यादी जाहीर केल्या जाईल, यादी अनुसार लाभार्थी महिलेला प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत १५०० रुपयांची मदद राज्य सरकार द्वारे केल्या जाईल.

लाडकी बहीण योजनेचे उद्देश्य

Objectives of Ladki Bahini Yojana

  • राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मितीला चालना देणे.
  • महिलांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी बनवणे.
  • राज्यात महिला सक्षमीकरणाला चालना देणे.
  • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणे.
Objectives of Ladki Bahini Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

(Ladki Bahin Yojana Documents List)

Mazi Ladki Bahin Yojana साठी खालील कागदपत्रे लागतील:

  • आधार कार्ड
  • वोटर आईडी कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • बँक पासबुक
  • आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक
  • रहिवासी दाखला
  • शिधापत्रिका
  • हमीपत्र
  • ladki bahin yojana form

माझी लाडकी बहिन योजनेसाठी पात्रता

(Ladki Bahin Yojana Eligibility, Age)

  • योजनेसाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
  • २१ ते ६५ वयोगटातील महिला अर्जदार पात्र असतील.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला अर्ज करू शकतात.
  • सादर योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, अर्जदार महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराकडे किंवा महिलेच्या कुटुंबाच्या नावावर ट्रॅक्टरशिवाय कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
  • महिला आणि कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावेत.
Ladki Bahin Yojana Eligibility

Ladki Bahin Yojana Online Apply

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

1Ladki bahini yojana online apply करण्यासाठी, तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in या योजनेची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल, अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर, अर्जदार लॉगिन वर क्लिक करावे.

ladki bahin yojana website
2अर्जदार लॉगिन वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्हाला create account वर क्लिक करावे लागेल.

majhi ladki bahin yojana login
3यानंतर, तुमच्यासमोर एक ऑनलाइन नोंदणी फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरावी लागेल.

ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पती/वडिलांचे नाव, पत्ता इत्यादी टाकावे लागतील आणि नंतर कॅप्चा प्रविष्टय करून Sign Up वर क्लिक करावे.

mazi ladki bahin yojana registration
4वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि मेनूमध्ये Application of mukhyamantri majhi ladki bahin yojana वर क्लिक करावे लागेल.

ladki bahin yojana form online
5यानंतर ladki bahini yojana form तुमच्यासमोर उघडेल. या फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमचे नाव, पती/वडिलांचे नाव, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक इत्यादी टाकावे लागतील.

Ladki bahin Yojana online form
6अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर, सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि कॅप्चा प्रविष्ट केल्यानंतर Submit वर क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे, या प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने योजना अंतर्गत अर्ज सादर करू शकता।

Upload documents

Mazi Ladki Bahin Yojana Form Download

Ladki Bahini Yojana Form PDF:

⬇️ Ladki Bahin Yojana Form PDFDownload
⬇️ Majhi Ladki Bahin Yojana Hami Patra PDFDownload

Majhi Ladki Bahin Yojana Registration

लाडकी बहीण योजना ऑनलाईन नोंदणी

Ladki Bahin Yojana New Update

Mazi Ladki Bahin Yojana Offline Apply

लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी महिलेला अंगणवाडी, ग्रामपंचायत किंवा आपले सरकार सेतू सुविधा केंद्रात जाऊन majhi ladki bahin yojana form maharashtra मिळवावा लागेल.
  • अर्ज प्राप्त केल्यानंतर, महिलांना त्यांची संपूर्ण माहिती अर्जामध्ये प्रविष्ट करावी लागेल, जसे की महिलेचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक इ.
  • यानंतर अर्जासोबत सर्व कागतपत्रे जोडायची आहे आणि कार्यालयामध्ये अर्ज जमा करायचा आहे.
  • अर्ज जमा केल्यानंतर महिलेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने केला जाईल, त्यानंतर महिलेचा फोटो काढला जाईल आणि केवायसी करण्यात येईल.
  • सगळं झाल्यानंतर महिलांना अर्जाची पावती देण्यात येईल.
  • अशा प्रकारे महिला ऑफलाईन माध्यमातून योजनेसाठी अर्ज करू शकतात.

Ladki Bahin Yojana List

लाडकी बहीण योजना यादी

लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर महिलांच्या अर्जांची छाननी केली जाते, त्यानंतर केवळ पात्र महिलांचे अर्ज स्वीकारले जातात आणि लाभार्थी महिलांची यादी जाहीर केली जाते, या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व महिलांना योजनेअंतर्गत पुढे लाभ दिला जातो.

  • यादी पाहण्यासाठी महिलांना नगर परिषद, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर महिलांना माझी लाडकी बहीण योजना यादी 2024 – 25 वर क्लिक करायचे आहे।
  • त्यानंतर, एक नवीन पृष्ठ उघडेल, येथे तुम्हाला तुमचा प्रभाग क्रमांक निवडावा लागेल.
  • प्रभाग निवडल्यानंतर download बटणावर क्लिक करा.
  • यानंतर, mazi ladki bahin yojana pdf डाउनलोड केली जाईल, या यादीमध्ये महिला त्यांची नावे तपासू शकतात.

Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List

लाडकी बहिणी योजना जिलावार लाभार्थी सूचि

Brihanmumbai Municipal CorporationAurangabad Municipal Corporation
Pune Municipal CorporationKalyan-Dombivali Municipal Corporation
Nagpur Municipal CorporationAmravati Municipal Corporation
Solapur Municipal CorporationNavi Mumbai Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationNanded-Waghala Municipal Corporation
Thane Municipal CorporationUlhas Nagar Municipal Corporation
Pimpri-Chinchwad Municipal CorporationSangli-Miraj-Kupwada Municipal Corporation
Nashik Municipal CorporationMalegaon Municipal Corporation
Akola Municipal CorporationBhiwandi-Nizampur Municipal Corporation
Bhayander Municipal CorporationAhmednagar Municipal Corporation
Dhule Municipal CorporationJalgaon Municipal Corporation
Vasai-Virar Municipal CorporationParbhani Municipal Corporation
Chandrapur Municipal CorporationLatur Municipal Corporation
Panvel Municipal CorporationIchalkaranji Municipal Corporation
Jalna Municipal Corporation

Ladki Bahin Yojana Status

  • लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर महिला त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहू शकतात.
  • अर्जाची स्थिती तपासण्यासाठी testmmmlby.mahaitgov.in ही वेबसाइट उघडा आणि लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि Get Mobile OTP वर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्या मोबाईलवर OTP प्राप्त केल्यानंतर, तुम्हाला तो OTP वेबसाइटवर टाकावा लागेल आणि Get Data बटणावर क्लिक करावे लागेल.
  • हे केल्यावर, एक नवीन पृष्ठ उघडेल, येथे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये दिसेल.
Majhi Ladki Bahin Yojana Online ApplyClick Here
Ladki Bahin Yojana List Click Here
Mazi Ladki Bahin Yojana StatusClick Here
Narishakti Doot App DownloadClick Here
Ladki bahini Yojana GRClick Here
Helpline Number181

Ladki Bahini Yojana Important Dates

योजनेची घोषणामुख्यमंत्री एकनाथ शिन्देजी
योजनेची सुरुवात1 जुलाई 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जुलाई 2024
स्वरूप निवड यादी जाहीर केली16 से 20 जुलाई 2024
मसुदा यादीवर आक्षेप, तक्रार21 से 30 जुलाई 2024
लाडकी बहीण योजना यादी1 अगस्त 2024
योजनेचे लाभ सुरू14 अगस्त से 2024
लाडकी बहीण योजना Last Date31 अगस्त 2024

Ladki Bahin Yojana FAQ

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र साठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे, महिला या ladakibahin.maharashtra.gov.in पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Ladki bahin yojana last date

लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख राज्य सरकारने ३० ऑगस्ट २०२४ निश्चित केली होती, आणि नंतर ती ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana हमीपत्र PDF Download

हमीपत्र तुम्ही योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ, नारीशक्ती दूत एप वरून डाउनलोड करू शकता।

Ladki Bahini Yojana website

ladakibahin.maharashtra.gov.in हि लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे.